राष्ट्रमाता जिजाऊंच्या प्रेरणेतून समाजसेवेचा संकल्प

पंख नव्या उमेदीचे’ — शिक्षणापासून वंचितांना नवी ओळख, नवी दिशा आणि नवं आयुष्य.

शिक्षण हाच सर्वांगीण विकास

गरजू विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देण्याचा आमचा संकल्प.

आमच्याबद्दल

स्थापना

समाजातील गरजू, वंचित आणि दुर्बल घटकांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने तसेच राष्ट्रमाता जिजाऊंच्या विचारांनी प्रेरित होऊन ‘आऊसाहेब सेवा प्रतिष्ठान’ची स्थापना करण्यात आली आहे. मानवतेची सेवा, शिक्षणाचा प्रसार आणि प्रत्येकाला स्वाभिमानाने जगण्याची संधी मिळावी, या ध्येयाने संस्था सातत्याने कार्यरत आहे.

ध्येय

शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि महिला सक्षमीकरण या चार आधारस्तंभांवर शाश्वत विकास घडवून समाज अधिक सक्षम, सशक्त आणि जागरूक बनवणे, हे आमचे ध्येय आहे.

आमचे उपक्रम

शिक्षण मदत

शिक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक मुलाला उज्ज्वल भविष्याची संधी देणे, हा आमचा मुख्य उपक्रम आहे.

आपुलकी

१८ वर्षांवरील मुलांसाठी मोफत शिक्षण, राहणे आणि खाण्याची हक्काची सोय उपलब्ध करून देणे.

महिला सक्षमीकरण

महिलांना सक्षम, स्वावलंबी आणि आत्मविश्वासी बनवून सशक्त समाज घडविण्याचा आमचा ध्यास.

गौशाळा

प्राणीमात्रांची सेवा हीच खरी मानवता – गोसेवेतून समाजसेवेचा आमचा प्रयत्न.

आरोग्य शिबिर

कोणत्याही प्रकारचे शुल्क न आकारता, निःशुल्क आरोग्य सेवा आणि शिबिरांद्वारे समाजातील प्रत्येक घटकापर्यंत सेवा पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

पर्यावरण रक्षण

निसर्गाचे रक्षण, भविष्यासाठी संवर्धन – हरित उद्याचा आमचा संकल्प.

"आपुलकी" – पंख नव्या उमेदीचे...

"१८ वर्षांवरील मुलांसाठी हक्काचे आणि सुरक्षित वसतिगृह"

परिचय

आऊसाहेब सेवा प्रतिष्ठान संचलित “आपुलकी - पंख नव्या उमेदीचे” हे वसतिगृह समाजातील गरजू, वंचित व आधारहीन १८ वर्षांवरील युवकांसाठी सुरक्षित व प्रेमळ निवासस्थान आहे. येथे केवळ राहण्याची सुविधा नसून, प्रत्येक व्यक्तीला आत्मनिर्भर, सुसंस्कृत व सक्षम नागरिक बनवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे.

आमची वैशिष्ट्ये

  • कुटुंबासारखे प्रेमळ व सुरक्षित वातावरण
  • अनुभवी मार्गदर्शक व सेवाभावी टीम
  • सर्वांगीण विकासावर विशेष भर
  • “पंख नव्या उमेदीचे” संकल्पनेतून नवी दिशा

मिळणाऱ्या सोयी-सुविधा

  • स्वच्छ व सुरक्षित निवास व्यवस्था
  • पौष्टिक अन्नाची सोय
  • शैक्षणिक मार्गदर्शन व करिअर काउन्सेलिंग
  • कौशल्य विकास प्रशिक्षण (Skill Development)
  • आरोग्य तपासणी व वैद्यकीय मदत
  • वाचनालय व अभ्यासासाठी शांत वातावरण

प्रवेशासाठी पात्रता

  • वय १८ वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक
  • गरजू, वंचित किंवा आधारहीन असणे
  • कागदपत्रे: आधार कार्ड, फोटो, शैक्षणिक पुरावे

नियम व अटी

  • शिस्त, स्वच्छता आणि वेळापत्रकाचे पालन करणे
  • कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन सहन केले जाणार नाही
  • वैयक्तिक विकासात सक्रिय सहभाग आवश्यक

ताज्या अपडेट्स

आमच्या फेसबुक पेजवरील ताज्या पोस्ट्स आणि घडामोडी थेट येथे पहा.

संपर्क

मेसेज पाठवा